शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By भाषा|

मनमोहन यांचा शुक्रवारी शपथविधी

संपुआ संसदीय आघाडीचे नेते मनमोहन सिंह येत्‍या 22 मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मंगळवारी संपुआ संसदीय समितीने मनमोहन सिंह यांना आपला नेता निश्चित केले. बुधवारी होणार असलेल्‍या बैठकीत कॅबिनेटमध्‍ये मंत्र्यांच्‍या समावेशाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

मंगळवारी झालेल्‍या बैठकीत सोनिया गांधी यांची सत्ताधारी संसदीय आघाडीच्‍या अध्‍यक्षपदी निवडण्‍यात आले आहे. तर प्रणव मुखर्जी यांना लोकसभेत पक्ष नेता पदी निवडण्‍यात आले आहे.