1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वार्ता|

राजनाथ सिंह करोडपती

राजनाथ सिंह
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जात त्यांनी आपली संपत्ती एक कोटी 24 लाख असल्याचे नमुद केले आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह, पक्ष प्रवक्ते रविशंकर प्रसाद आणि अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राजनाथ यांनी आपला अर्ज दाखल केला.

सिंह यांच्या अर्जावर उत्तर प्रदेशचे माजी मंत्री बालेश्वर त्यागी, गाझियाबादचे आमदार सुनील शर्माल महापालिकेच्या अध्यक्षा दमयंती गोयल आदींच्या स्वाक्षरी आहेत.

आपल्याकडे 21 लाख 24 हजार 867 रुपयांची संपत्ती, 75 हजार रुपयांचे सोने, दोन लाख रुपयांचे रत्न,45 लाख रुपयांची जमीन आणि लखनोमधील गोमतीनगर येथे 55 लाख रुपयांचे घर असून, पत्नीकडे 11 लाख रुपयांची संपत्ती असल्याचे राजनाथ यांनी आपल्या अर्जावर नमूद केले आहे.