1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
  6. शशी थरूर यांचे पहिल्यांदाच मतदान

शशी थरूर यांचे पहिल्यांदाच मतदान

संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी अधिकारी व येथून लोकसभेसाठी कॉंग्रेसतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शशी थरूर यांनी आज प्रथमच मतदान केले. अनिवासी भारतीय असलेले थरूर बरीच वर्षे देशाबाहेर असल्याने त्यांना मतदानाची संधी कधी मिळालीच नव्हती.

अखेर मी माझ्या भारतीय लोकशाहीसाठी मतदान करू शकलो, अशी त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया म्हणूनच बोलकी ठरली. थरूर १९ वर्षाचे असतानाच भारत सोडून परदेशात शिक्षणाला गेले होते. तिथेच ते कार्यरतही होते. संयुक्त राष्ट्रसंघात ते अंडर सेक्रेटरी होते. त्यानंतर ते भारतात परतले आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले. यामुळेच 'आजचे मतदान हा मला मिळालेला मोठा हक्क असल्याची जाणीव मला झाली. त्यातच ते मत मलाच द्यायला मिळाले, हा वरचा 'बोनस' आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.