संजयला महागात पडली ''जादू की झप्पी''
सिनेमातून राजकारणात आलेल्या संजय दत्तला अजूनही रिल आणि रियल लाईफमधला फरक समजलेला नाही. पडद्यावर कुणा बोलवत्या धन्याचे संवाद बोलून टाळ्या घेणार्या संजयला आता राजकारणात स्वतः लिहिलेले संवाद बोलून दाखवावे लागत आहेत. पण याच संवादामुळे तो आता अडचणीतही आला आहे.
मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये 'जादु की झप्पी' देणार्या या मुन्नाभाईने उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात मायावतींनाही 'जादू की झप्पी' देण्याची आपली इच्छा प्रदर्शित केली. ही बाब निवडणूक आयोगाच्या कानावार गेल्यानंतर त्यांनीही त्याच्याकडे डोळे वटारले. त्याला तत्काळ नोटीस धाडण्यात आली असून चोवीस तासाच्या आता जबाब मागितला आहे. सोळा एप्रिलला झालेल्या या सभेत संजूबाबाने मायावतींच्या संदर्भात काही अपशब्दही उच्चारले होते.
संजयच्या बाबतीत आचारसंहिता भंगाचे हे दुसरे प्रकरण आहे. या आधी आपली आई मुस्लिम असल्याने आपल्याला टाडा लावण्यात आला नि कोठडीत आपल्याला मारहाण करण्यात आल्याचे म्हटले होते. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता.