सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

आता मुलींना पाहून शिटी मारल्यास 60 हजार रुपये दंड

रस्त्यावरुन एखादी मुलगी जात असेल तर त्या मुलीची छेड काढण्यासाठी मुले शिटी वाजवतात. काही मुले तर थेट घाणेरड्या कमेंटही करतात. पण आता रस्त्यावरुन जात असलेल्या मुलींना पाहून शिटी वाजवणे मुलांना चांगलेच महागात पडू शकते. कारण आता जर मुलींना पाहून कुणी शिटी मारली तर पोलीस त्या मुलांकडून 60 हजार रुपये वसूल करणार आहे. फ्रान्स सरकारने हा नियम केला असून शिटी मारल्यास आता 60 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. रोडरोमिओंना आळा घालण्यासाठी फ्रान्स सरकारने हा नियम तयार केला आहे. 
 
यानुसार आता मुलींवर घाणेरड्या कमेंट करणे, त्यांचा पाठलाग करणे, त्यांच्याकडे पाहून घाणेरडे हावभाव करणे, शिटी वाजवणे मुलांना महागात पडणार आहे. आता शिटी वाजवणेही गुन्हा ठरवण्यात आला आहे. फ्रान्समध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत आता कठोर पावले उचलली जात आहे. त्यानुसारच हा नियम करण्यात आला आहे. महिलांची छेडछाड रोखण्यासाठी शिटी वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो हे महिलांना सुरक्षा देण्यासाठी वेगवेगळ्या उपययोजना करत आहेत. 
 
फ्रान्समध्ये काही महिन्यांपूर्वी एक सर्व्हे करण्यात आला असून यासर्व्हेनुसार, देशातील महिलांना सार्वजनिक जागांवर विनयभंगाचा सामना करावा लागतो. यातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांचे म्हणने होते की त्यांच्यासोबत पहिल्यांदा छेडछाड झाली तेव्हा त्या 18 वर्षांच्या होत्या. याचा अर्थ इथे अनेकांकडून कमी वयाच्या मुलींना शिकार केले जात आहे. त्यामुळेच फ्रान्समध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली आहेत.