गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (14:26 IST)

चालत्या ट्रेनमध्ये जोडप्याने लग्न केलं

Wedding Snake
सध्या लग्न सराई सुरु झाली आहे. सध्या सोशल मीडियावर लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ दिसतात. सध्या सोशल मीडियावर एका जोडप्यानं वेगळ्या पद्धतीनं केलेलं लग्न चांगलेच व्हायरल झाले आहे. या जोडप्याने धावत्या ट्रेन मध्ये प्रवाशांच्या मध्ये लग्न केलं 

मुलगा ट्रेनमध्ये मुलीला सिंदूर लावतो आणि नंतर तिला मंगळसूत्र घालायला लावतो. यानंतर दोघांनीही एकमेकांना पुष्पहार घातला. दोघेही लग्न करत असताना त्यांच्या आजूबाजूला लोकांची मोठी गर्दी दिसत आहे.
 
य व्हिडीओ मध्ये एका मुलाने मुलीच्या भांगेत सिंदूर भरले आणि गळ्यात मंगळसूत्र घातले. नंतर एकमेकांना हार घातले. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून हा व्हिडीओ सुमारे 1 लाख हुन अधिक लोकांनी बघितला आहे. लोक आपापली प्रतिक्रिया देत आहे.एका युजरने लिहिले - याला लव्ह मॅरेज नाही तर ट्रेन मॅरेज म्हटले जाईल. दुसर्‍या यूजरने लिहिले - भाऊ, तो खूप वेगवान आहे.
 
Edited by - Priya Dixit