मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 नोव्हेंबर 2020 (16:52 IST)

अमृता फडणवीस यांचा शिवसेनेला टोला, शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असा केला

Amrita Fadnavis attacked
बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असा केला आहे. तसंच शिवसेनेने बिहारमध्ये आपल्या साथीदारांना ठार मारले, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्र कुठेही नेऊन ठेवला असेल पण बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबद्दल धन्यवाद.., असंही अमृता फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.
 
बिहार निवडणूक निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीतला काही सेकंदाचा व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस शिवसेना आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका करताना दिसून येत आहे. हाच व्हिडीओ ट्विट करत अमृता यांनीही शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.