भोंगा वाजवणाऱ्यांना पोलिसांनी दाखवला इंगा; दिली ही शिक्षा
सध्या तरुण वेगळ्याच जोशात असतात. गाडीवर जातांना मोठ्या-मोठ्यानं हॉर्न वाजवणं, गाड्यांवर स्टंट करणं , वेगाने गाडी पळवणे हे सामान्य झालं आहे. जत्रा असो किंवा काहीही समारंभ असो तरुणाच्या गट प्लास्टिकचा भोंगा वाजवून धिंगाणा घालतात. त्यांच्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे सर्व सामान्य माणसाला त्रास होतो. पण हे तरुण आपल्याच नादात असल्यामुळे त्यांना कोणाचीही भीती नसते. मात्र अशा प्रकारचा धुडगूस घालणाऱ्या तरुणांना मध्यप्रदेशातील जबलपूरच्यागढा पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. त्यांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी जे काही केले ते त्यांना आयुष्यभर विसरता येणं अशक्य आहे.
दसऱ्याच्या जत्रेत रस्त्याच्या आणि घराजवळ काही तरुण टवाळखोर मुलं मोटारसायकलवर बसून प्लस्टिकचा भोंगा वाजवत असताना दिसले. दसऱ्याच्या जत्रेतून हे तरुण परतताना मोठ्या मोठ्यानं भोंगा वाजवत लोकांना त्रास देताना दिसले होते. पोलिसांनी त्यांना असं करण्यापासून रोखले आणि त्यांना रस्त्याच्या मधोमध कां धरून उठाबशा काढायला लावले.
त्यांनी कुणाच्या कानशिलात लगावली तर कुणाला कान धरून उभे राहायला सांगितले, तर कुणाला एक मेकांचा कानाखाली लावायला सांगितले, तर एकाला भोंगा घेऊन दुसऱ्याच्या कानात वाजवायला सांगितले. जेणे करून त्यांना या आवाजामुळे लोकांना किती त्रास होतो ह्याची जाणीव व्हावी. या सर्व घटनेचा व्हिडीओ काढण्यात आला असून वेगवेळ्या प्लॅटफॉर्म वर शेअर करण्यात आला आहे. अशी शिक्षा पाहून तरुणांना चांगलाच धडा मिळाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर शेकडो युजर्सने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Edited By - Priya Dixit