गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (12:45 IST)

बॉयफ्रेंडसाठी पाच मुलींमध्ये जोरदार भांडण

मुलींच्या भांडणाचा व्हिडिओ बिहारच्या सोनपूरच्या जत्रेचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाच मुली एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत सांगितले जात आहे की, या मुलींनी प्रियकरासाठी रस्त्यावरच भांडण सुरू केले
 
बिहारच्या सोनपूर जत्रेचा एक व्हिडिओ इंटरनेट मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाच मुली भांडत आहेत.  बिहारच्या हरिहर भागातील सोनपूर जत्रेत पाच मुली बॉयफ्रेंडसाठी आपापसात भांडत असल्याचा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पाच मुली एकमेकांशी भांडत आहेत, तर प्रियकर एकमेकांना वाचवत आहेत.बॉयफ्रेंडसाठी सर्व मुली जत्रेतच भांडू लागल्या.
जत्रा परिसरात रस्त्याच्या मधोमध मुली आपापसात भांडत आहेत. मुलींमध्ये हे भांडण प्रियकरावरून झाल्याची चर्चा आहे. ही घटना तीन दिवस जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. असे म्हणतात की, एक मुलगा एका मुलीला जत्रेत फिरायला घेऊन जात होता, तेवढ्यात अचानक तीन-चार मुली त्या मुलीशी भांडू लागल्या, त्यांनी सांगितले की हा माझा प्रियकर आहे.रस्त्यात मुलींनी एकमेकांना चोपले आणि जोरदार धक्काबुक्की केली. 

जत्रेत रस्त्यावरच्या मारामारीमुळे स्थानिक लोक हैराण झाले होते, पण हा मुलींचा विषय असल्याने लोकांनी हस्तक्षेप नाही. तरुणही गोंधळला. मुलींना अचानक भांडताना पाहून आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित झाले. मात्र, मुलींसोबत एक तरुणही होता. तो मुलींना भांडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होता. आधी वादावादी आणि नंतर हाणामारी सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हाणामारीचा व्हिडीओ कोणी तरी  बनवून सोशल मीडिया वर व्हायरल केला. 

Edited By- Priya Dixit