परदेशी प्रेयसी तिचे केले अश्लिल व्हिडियो व्हायरल, अभिनेत्याला अटक
परदेशातील स्थित असलेल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी मुंबईतून एका अभिनेत्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा अभिनेता मुंबई येथील मीरा रोडचा रहिवासी असून, त्याचे नाव राज सिंग असे आहे. तर विशेष म्हणजे या आरोपीने तरुणीकडून तब्बल सात लाख रुपये देखील दबाव टाकत उकळले आहेत. यामध्ये बातमी अशी की, न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय तक्रारदार तरुणीसोबत सोशल मीडियावर राज सिंगची ओळख झाली. दोघांमधील संवाद वाढू लागला सोबतच ते दररोज मोबाईलवर चॅट करत होते. त्यांनी मैत्रीतून एकमेकांशी भावनिक बंध जुळले आणि ती मुलगी आरोपीच्या प्रेमात पडली होती. याचाच फायदा घेत सिंग ने तिचे काही खासगी व्हिडीओ आणि फोटो मागवले होते.
त्यांनी काही महिने एकमेकांशी चॅटिंग केल्यामुळे तरुणीने विश्वासाने राजला आपले व्हिडीओ पाठवले होते, मात्र जसे फोटो आणि व्हिडीओ हाती येताच राजचा सूरच बदलाल होता. राजने तिला धमकी दिली आणि ‘पैसे पाठवले नाहीस, तर तुझे खासगी व्हिडीओ आणि फोटो तुझ्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना आणि मित्र मंडळींना पाठवेन’ असे सांगितले. या धमकीला घाबरुन तिने टप्प्याटप्प्यात 10 हजार डॉलर्स असे जवळपास सात लाख रुपये राजला दिले.
नंतर तिने पैसे पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी राजने तरुणीचा एक व्हिडीओ तिच्या मित्राला पाठवला असल्याने तिने राजविरोधात इमेलद्वारे मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी राजला त्याच्या घरातून बेड्या ठोकल्या आहेत.