शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 13 जून 2022 (19:33 IST)

सासू सासऱ्यांना खोलीत बंद करून अल्पवयीन नणंदेला घेऊन नवी नवरी पळाली

राजस्थानच्या पुष्कर मधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. लग्न करून आणलेली नववधू आपल्या अल्पवयीन नणंदेला घेऊन पळाली आहे. पूजा असे या तरुणीचे नाव असून ती झारखंडच्या जुम्मा रामगडची आहे. पूजाचे लग्न 27 मे रोजी पुष्करच्या पंचकुंड येथील यतू श्रीवास्तव (28) याच्यासह झाले. यांचे लग्न होण्यासाठी श्रीवास्तव कुटुंब गेल्या 4 महिन्यांपासून मध्यस्थी पंकज कुमार यांच्या संपर्कात होते. पंकज देखील झारखंडचा रहिवासी आहे. श्रीवास्तव कुटुंबीयांनी हे लग्न जुळवायला पंकज ला 3 लाख 50 हजार रुपये दिले होते. 
 
ठरलेल्या तारखेला म्हणजे 27 मे रोजी पूजा आणि यतूचे थाटा माटात लग्न झाले. काही दिवसानंतर यतू कामानिमित्त बाहेर गेला. 10 जून रोजी नववधू पूजा घरात कोणालाही न सांगता आपल्या 13 वर्षाच्या अल्पवयीन नणंदेला सोबत घेऊन गेली आणि परत आलीच नाही. तिने जाताना आपल्या सासू -सासऱ्याला एका खोलीत डांबून ठेवले. 
सासऱ्यांनी घराची तपासणी केल्यावर लग्नात नववधू पूजाला दिलेले 5 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल आणि कॅमेरा देखील गायब होते. कुटुंबीयांनी आपल्या परीने त्यांचा शोध घेतला. शोध घेऊन देखील त्या दोघी सापडल्या नाही तेव्हा पूजाच्या सासऱ्यांनी पुष्कर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली     
 
पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी घेत आहे. तसेच पोलीस पुष्कर बस स्टॅन्ड आणि अजमेर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज देखील पाहत आहे. तसरच त्या दोघींच्या छायाचित्राच्या माध्यमातून देखील शोध लावत आहे. आता पर्यंत पूजा आणि तिची नणंद झारखंडला निघून गेल्याचे समजले आहे.  
पुष्कर पोलिसांनी याप्रकरणी जुम्मा रामगड पोलिसांशीही संपर्क साधला आहे. सध्या तपास सुरू आहे.
 
पूजाचा नवरा यातू अपंग असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला काहीही ऐकूयेत नाही आणि बोलताही येत नाही. याच कारणामुळे श्रीवास्तव कुटुंबीय लग्नासाठी पंकज कुमार यांच्या संपर्कात आले. श्रीवास्तव कुटुंबाने पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला त्यांची 13 वर्षाची अल्पवयीन मुलगी सुरक्षित असल्याची खात्री करण्याचे आवाहन केले आहे. 
पूजा स्वतः पळून गेली की प्रकरण आणखीनच काही आहे, आता हे पूजा सापडल्यावरच कळेल. पोलीस प्रकरणाचा शोध घेत आहे.