रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 एप्रिल 2018 (09:38 IST)

आयआरसीटीसीने केले तिकीट बुकिंगच्या नियमात बदल

आयआरसीटीसीने ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.नव्या नियमांनुसार आता प्रवासी १२० दिवस आधी तिकीट बूक करु शकतील. ऑनलाईन बुकिंगमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे एक युजर आयडी वापरून महिन्याला फक्त ६ तिकीटं बूक करता येतील. जर यूजरनं त्याचं आधार कार्ड आयआरसीटीसीकडे रजिस्टर केलं तर महिन्याला १२ तिकीटं बूक करता येणार आहेत. सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत फक्त २ तिकीटं बूक करता येणार आहेत तसंच या कालावधीमध्ये सिंगल पेज किंवा क्विक बुकिंग होणार नाही. यूजर ऑनलाईन आल्यावर त्याला वैयक्तिक माहितीही भरावी लागणार आहे.

बुकिंग एजंटसाठींच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. एजंट आता सकाळी ८ ते ८.३०, सकाळी १० ते १०.३० आणि ११ ते ११.३०मध्येच तिकीटं बूक करु शकतात. म्हणजेच एजंटना आता फक्त अर्धा तासच तिकीटं बूक करता येणार आहेत. तत्काळ बुकिंग प्रवासाच्या एक दिवस आधीच १० वाजता सुरु होईल. जर ट्रेन तीन तासांपेक्षा जास्त उशीरा असेल तर यात्री त्याच्या तिकीटाचे पूर्ण पैसे परत मागू शकतो. ट्रेनचा मार्ग बदलला तरीही प्रवाशाला तिकीटाचे पैसे मागता येणार आहेत.