गुगलकडून 145 धोकादायक अॅप्सची यादी जाहीर
गुगलने अँड्रॉईड मधल्या सर्वात धोकादायक अशा 145 अॅप्सची यादी जाहीर केली आहे. या अॅपमध्ये व्हायरस आहे. सदरचे अॅप असल्यास, बँक खाते, ई मेल आणि सोशन मिडियाची खाती हॅक होण्याची शक्यता आहे. ही अॅप तातडीने डिलीट करण्यास गुगलने सांगितले आहे.
गुगलने दिलेल्या माहितीनुसार ही व्हायरस असलेली अॅप्स मोबाईलसाठी धोक्याची नाहीत. मात्र, तो वापरणाऱ्याच्या माहितीची चोरी होऊ शकते. तसेच हा फोन कॉम्प्युटरला जोडल्यास त्याद्वारे हा व्हायरस कॉम्प्युटरमध्येही घुसू शकतो. ही अॅप कीबोर्ड वर टाईप केलेली अक्षरे साठवून ठेवू शकतात. याद्वारे हॅकर्स तुमची बँक डिटेल्स, क्रेडिट-डेबिट कार्डची माहितीसह अन्य खासगी माहिती चोरू शकतात.
यात बेबी रूम, मोटरट्रेल, टॅटू नेम, कार गॅरेज, जापनीज गार्डन, हाउस टेरेस, स्कर्ट डिझाइन, योग मेडिटेशन, शू रॅक, यूनीक टीशर्ट, मेन्स शूज, टीवी रुआंग टामू, आयडिया ग्लासेज, फॅशन मुस्लिम, ब्रेसलेट, क्लॉथिंग ड्रॉइंग, मिनिमलिस्ट किचन, नेल आर्ट, आइस्क्रीम स्टिक, रूफ, चिल्ड्रन क्लॉथ्स, होम सीलिंग, पाला बाजू, लिविंग रूम, बुकशेल्फ, निटेड बेबी, हेयर पेंट, वॉल डेकोरेशन, पेंटिंग मेहंदी, बॉडी बिल्डर, कपल शर्ट्स, विंडो डिझाइन, हिजाब स्टाइल, विंग चुन, फेंसिंग टेक्नीक, लर्न टू ड्रॉ क्लॉथिंग अशी अॅप्सची यादी आहे.