1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019 (09:46 IST)

डोकं थंड ठेवण्यासाठी आता खास ‘वातानुकूल’ हेल्मेट

Now special 'air conditioning' helmet to keep your head cool
हेल्मेट घातल्यानंतर अनेकांच्या डोक्याला घाम फुटतो, गरम अधिक होत. नागरिकांच्या याच समस्येवर बेंगळुरूच्या एका मॅकेनिकल इंजिनिअरने उपाय शोधला आहे. या इंजिनिअरने एक खास वातानुकुलीत हेल्मेट बनवलं आहे. याद्वारे दुचाकी चालवताना डोकं थंड राहतं.
 
एक मल्टीनॅशनल कंपनीत इंजिनिअर असलेल्या संदीप दहियाला युजर फ्रेंडली उपकरणं बनवायला आवडतात. गेल्या साडेचार वर्षांमध्ये आठ वेगवेगळे मॉडल डिझाइन केल्यानंतर अखेर एसी हेल्मेट बनवण्यात संदिपला यश आलं. ‘वातानुकूल’ असं या हेल्मेटला नाव देण्यात आलं आहे. हे एसी हेल्मेट बाइकच्या बॅटरीद्वारे सप्लाय होणाऱ्या डीसी पावर (12 व्होल्ट) वर कार्यरत असतं. कुलिंग इफेक्टसाठी अन्य कोणत्याही अतिरिक्त ऊर्जेची आवश्यकता नाही.
 
वातानुकूल नावाच्या या हेल्मेटचं वजन 1.7 किलोग्रामपेक्षाही कमी आहे. तर, बाजारात उपलब्ध असलेल्या अधिकांश हेल्मेटचं वजन 800 ग्राम ते 2 किलोग्रामच्या रेंजमध्ये असतं. एसी हेल्मेटचे दोन भाग आहेत. यातील एका भागात रबर ट्यूब आहे, याद्वारे हेल्मेटच्या आतमध्ये एअर सर्क्युलेशनचं काम होतं. तर, दुसरा भाग बॅकपॅकप्रमाणे असतो. यात रिव्हर्स थर्मो कपल, हीट ऐक्स्चेंजर, कंट्रोल आणि ब्लोअरचा समावेश आहे.