मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 11 एप्रिल 2018 (00:12 IST)

जगातला सर्वात महागडा परफ्यूम

perfum
अतिशय काळजी काट्याने आणि सर्वोत्तम कच्चा माल वापरून बनविले जाणारे परफ्यूम म्हणून क्लाईव्ह क्रिस्टीयन परफ्यूम ओळखले जातात. यातही सर्वात महागडा परफ्यूम नंबर वन या नावानेच प्रसिद्ध असून तो जगातील सर्वात महागडा परफ्यूम आहे. या परफ्यूसाठी वापरली गेलेली कुपीही अतिशय नाजूक, देखणी आणि दुर्मीळ मानली जाते. नंबर वन परफ्यूच्या या असाधारण सुंदर क्रिस्टल कुपीवर 24 कॅरेट सोन्याचे नाजूक जाळीदार काम केले गेले आहे. त्यात हिरे जडविले गेले असून त्यातून सिंहाची आकृती बनविली गेली आहे. या सिंहाच्या डोळ्यांसाठी पिवळे हिरे तर जिभेसाठी दुर्मीळ गुलाबी हिरा वापरला गेला आहे. या बाटलीत 30 मिलीलिटर परफ्यूम मावतो आणि त्यासाठी मोजावी लागणारी किंत आहे 1 लाख 43 हजार पौंड. म्हणजे 1 कोटी, 30 लाख 47 हजार रुपये. 1872 साली ब्रिटनध्ये सुरु झालेल्या या पर्फ्युमरी संस्थेचे संरक्षक क्लाईव्ह क्रिस्टीयान हे एकमेव आहेत ज्यांना राणी व्हिक्टोरियाच्या मुकुटाची प्रतिमा वापरण्याची परवानगी दिली गेली होती.