पाळीव मांजरीने मालकाच्या बॉसला राजीनामा पत्र पाठवले, मालकाने नौकरी गमावली
पाळीव प्राणी घरी ठेवणे हा अनेकांचा छंद असतो. काही लोक त्यांच्या प्रेमापोटी जनावरेही घरात ठेवतात. अनेक वेळा हे प्राणी नकळत त्यांच्या मालकाशी मोठा घोटाळा करतात. नुकतेच एका महिलेसोबत असेच काहीसे घडले. महिलेने तिच्या घरात एक नाही दोन नाही तर तब्बल दहा मांजरीना पाळले होते. पण या मांजरींमुळे तिला आपली नौकरी गमवावी लागली.
हे संपूर्ण प्रकरण दक्षिण- पश्चिम चीनच्या चोंगकिंग नगरपालिकेतील आहे. 25 वर्षीय महिला आपल्या नोकरीला कंटाळली होती. तिला तिची नौकरी सोडायची होती. पण तिला भीती वाटायची की तिला नौकरी नसल्यावर मांजरींना खायला कैसे घालणार.
महिलेने नौकरी सोडण्यासाठी राजीनामा लिहून ठेवला होता. अणि तो लेपटॉप मध्ये मेल मध्ये सेव्ह करून ठेवला होता. मेल उघडले होते आणि लेपटॉप देखील सुरु होता. एकाएकी एका मांजरीने लॅपटॉपवर उडी मारली आणि तिच्या पायाने बटण दाबले गेले. आणि तो मेल बॉस कड़े गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
मांजरीमुळे राजीनामा पत्र आपल्या बॉसपर्यंत पोहोचल्याचे पाहून महिलेने लगेच फोन करून आपले मत व्यक्त केले आणि ते स्वीकारू नये असे आवाहन केले.मात्र, बॉसने त्यांच्या आवाहनाकडे आणि शब्दांकडे दुर्लक्ष केले. यानंतर त्याने कंपनीतील बोनस आणि नोकरी दोन्ही गमावले. महिलेने सांगितले की ती नवीन नोकरीच्या शोधात आहे कारण तिला तिच्या मांजरींना पाळीव आणि खायला घालायचे आहे.
Edited By - Priya Dixit