Festival Posters
✕

शिवजयंती २०२०, न्यूयॉर्क

Updated: बुधवार, 19 फेब्रुवारी 2020 (20:05 IST)
 
मनोज शिंदे, उद्योगपती, CEO tCognition Softwares
गूगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या अनेक अमेरीकन कॉर्पोरेट जगतात आज भारतीय व्यक्ती CEO सारख्या उच्चपदांवर आहेत. मराठी मुला-मुलींनी व्यवसायात उतरण्याचे आवाहन करीत आज कार्यक्रमात करिअर व उद्योजक मार्गदर्शन शिबिराचे महत्व सांगितले.
 
*ए के विजयकृष्णन, सामाजिक कार्य कॉन्सुल, भारतीय वाणिज्य दूतावास, न्यूयॉर्क *
भारतीय वाणिज्य दूतावास यांच्या तर्फे सामाजिक उपक्रमांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
शिवजयंती साजरी करणारी अमेरिकेतील प्रथम वाणिज्य दूतावास असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला व सह-आयोजक छत्रपती फाऊंडेशनच्या भावी कार्यक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
करिअर व उद्योजक मार्गदर्शन:
श्री श्याम कुमार , CEO of I&I Softwares
श्री अमित शोरेवाला, President of ASA College in NY and Florida
श्री किशोर गोरे, Vice President at Global Infotec Solutions
श्री गौरव दळवी, समन्वयक
 
यावेळी छत्रपती फाऊंडेशन चे अनेक वर्षांपासून सदस्य असलेले व विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात आला:
श्री महेंद्र सिनारे, owner, 200-rooms hotel(Tennessee)
श्री रोहन डाबरे, Mumbai Rasoi Restaurant (Rhode Island)
कु अलिशा मर्चंट, Miss Bharat New York 2019
 
दूतावासातर्फे श्री रामास्वामी मुरुगेसन ह्यांनी पासपोर्ट, व्हिसा व NRI योजनांबद्दल माहीती दिली तर मुग्धा धैसास ह्यांनी अमेरिकेत शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. 
• न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कनेक्टिकट, पेनसिल्व्हेनिया आणि मॅसॅच्युसेट्स या सभोवतालच्या राज्यातून आलेल्या शिवभक्तांनी हॉल भरगच्च भरला होता .
छत्रपती फाऊंडेशनने त्याच वेळी डेन्व्हर (कोलोरॅडो) व डलास (टेक्सास) येथे सुद्धा शिवजयंती आयोजित केली.
• छत्रपती फाऊंडेशन एक तरुण आणि विद्यार्थी संस्था आहे जी आंतरराष्ट्रीय स्तरावर शिवाजी महाराजांच्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष विचारांचा प्रचारास समर्पित आहे.
• जिजाऊ जयंती, आंबेडकर जयंती, शाहू जयंती, अहिल्याबाई होळकर जयंती, सावित्रीबाई फुले जयंती इत्यादीसह इंडिया डे परेड यासारखे उपक्रम वर्षभर राबविले जातात.
• कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष विनोद झेंडे, सचिव गौरव दळवी, कल्याण घुले (अल्बनी), अभिनव देशमुख (जॉर्जिया ), ऋषिकेश माने (पेनसिल्व्हेनिया), साकेत धामणे (न्यूयॉर्क), प्रशांत भुसारी (टेनेसी), प्रियंका कुरकुरे (न्यूजर्सी), श्रद्धा सहाणे (न्यूजर्सी), सुरेश गायकवाड (कनेक्टिकट) ह्या पदाधिकाऱयांसह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
• कार्यक्रमास क्रिकेट्स्टार अजिंक्य रहाणे, खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमदार विनायक मेटे ह्यांनी विडिओ संदेशाद्वारे सदिच्छा दिल्या.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments