1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (11:29 IST)

Sonali Phogat death:भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

BJP leader and Tik-Tok star Sonali Phogat passed away due to a heart attack In GOA
भाजप नेत्या आणि टिक-टॉक स्टार सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्या  42 वर्षांच्या  होत्या आणि टिक-टॉक स्टार देखील होत्या. असे सांगितले जात आहे की त्या आपल्या काही स्टाफ सदस्यांसह गोव्याला गेल्या असता काल रात्री हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले. सोनालीने हरियाणातील आदमपूर मतदारसंघातून भाजप नेते कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात मागील निवडणूक लढवली होती ज्यात त्या पराभूत झाल्या.
 
सोनाली आगामी आदमपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून तिकीटावर दावा करत होत्या. गेल्या आठवड्यात कुलदीप बिश्नोई यांनीही त्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती, ज्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले होते. सोनाली फोगट हिने हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. हिसारमधून त्यांनी कुलदीप बिश्नोई यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.