रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. ट्रेडिंग
Written By
Last Modified: बुधवार, 20 मार्च 2024 (12:52 IST)

फालुदामध्ये 'वीर्य' मिसळून लोकांना खाऊ घालत होता, व्हिडिओ व्हायल झाल्यावर अटक

rajasthan vendor
विविध देशी- विदेशी पदार्थांचे व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातले काही तर असे आहेत की त्यांच्याकडे बघितल्यावर असे वाटते की असे कोणी कसे काय करू शकते. आता असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला मळमळू शकते किंवा उलट्या देखील होऊ शकतात. कारण आता जेव्हा कधी तुम्ही तुमच्या समोर हा पदार्थ पाहाल, तेव्हा ही बातमी किंवा व्हायरल होत असलेला व्हिडिओ तुमच्या ध्यानात येईल. तुम्हाला किळस वाटेल.
 
तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील नेक्कोंडा मंडल येथील एक व्हिडिओ 19 मार्च रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या परिसरात रस्त्याच्या कडेला कुल्फी आणि आईस्क्रीम विकणारा एक व्यक्ती हस्तमैथुन करताना दिसला. त्याची कृती इथेच संपली नाही. त्याने हस्तमैथुन केल्यानंतर त्याचे वीर्य फालूदामध्ये मिसळले होते. ही संपूर्ण घटना शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर व्हायरल केली. व्हायरल झालेल्या पोस्टवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. 
Ice-cream seller
Ice-cream seller
राजस्थानमधील कार्ट विक्रेत्यावर गुन्हा दाखल
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तपास सुरू झाला. तेलंगणा पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, आईस्क्रीम स्टॉल चालवणारी व्यक्ती राजस्थानची रहिवासी आहे. कालूराम कुर्बिया असे त्याचे नाव आहे. रिपोर्टनुसार नेककोंडा पोलिसांनी या कृत्यासाठी कुर्बियाला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
प्रकरण वाढल्यावर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनाही कळवण्यात आले. वृत्तानुसार अन्न निरीक्षकांनी आरोपींच्या स्टॉलला भेट दिली. तेथून अन्नाचे नमुने घेण्यात आले. जे तपासासाठी पाठवण्यात आले आहेत.