शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (21:46 IST)

तुफान मारामारीचा व्हिडिओ व्हायरल

girl fight
social media
सध्या सोशल मीडियावर भांडणाचा व्हिडीओ नेहमीच व्हायरल होतात. कधी बस मध्ये सीट वरून भांडण होतात तर कधी मेट्रो मध्ये सीटवरून भांडण होतात. तर कधी मुलींमध्ये एकाच बॉयफ्रेंड वरून हाणामारी व्हायरल होते.अशाच एक मुलींचा मारहाण केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये  मुली एकमेकींचे केस ओढून लाथा बुक्याने हाणामारी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका कार पार्किंग मधला आहे. मुलींची हाणामारी होत असताना बघून काही लोकांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या कोणालाही जुमानत नसे. मुलींच्या या मारामारीच्या व्हिडीओ @videoIrish नावाच्या अकाउंट वरून x प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे.  
 
या व्हिडीओ मध्ये दोन मुली एकमेकांशी भांडण करताना दिसत आहे. सुरुवातीला त्यांच्यात काही वाद होतात नंतर त्या एकमेकींचे केस ओढायला सुरु करतात. एकमेकींना लाथा बुक्यांनी मारत आहे, तिथे उपस्थित काही लोकांनी ही मारामारी आपल्या फोनच्या केमेऱ्यात रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर पोस्ट केली. मारामारी कोणत्या कारणावरून झाली अद्याप हे समजू शकले नाही. तिथून जाणारा एक व्यक्ती त्यांना भांडण्यापासून रोखतो. तो येताच गर्दी पळून जाते. 
 
त्यात उभे असलेले लोक धावू लागतात. तो जमिनीवर भांडणाऱ्या दोन मुलींना वेगळे करण्याचा प्रयत्न करतो. थोड्याच अंतरावर चार मुलीही अशाच पद्धतीने भांडत आहेत.तेवढ्यात एक बाई येते आणि चार मुलींना भांडण थांबवायला सांगते. यामध्ये ती व्यक्ती जमिनीवर भांडणाऱ्या दोन मुलींना वेगळे करण्यात यशस्वी ठरते. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  
 





Edited by - Priya Dixit