दिल्लीमध्ये आज NDA आणि INDIA दोघांची बैठक, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकाच फ्लाईटमध्ये
लोकसभा निवडणूक 2024 चे परिणाम समोर आल्या नंतर आता सर्वांची नजर सरकारच्या निर्मितीवर वर आहे. यासाठी दिल्लीमध्ये आज NDA आणि INDIA दोघांची बैठक होणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप नेतृत्ववाले एनडीए महायुतीने सरकार बनवण्याचा दावा केला आहे. तर विरोधी पक्ष दल इंडिया युतीने आतापर्यंत आपले पत्ते उघडले नाही. यासाठी आज बुधवारी राजधानी दिल्लीमध्ये एनडीए आणि इंडिया दोन्ही पक्षांची वेगवेगळी बैठक होणार आहे. निवडणुकीमध्ये एनडीए 292 सिटांनी जिंकली तर इंडिया 232 सीट जिंकली.
मिळालेल्या माहितीनुसार नितीश कुमार NDA च्या बैठकीमध्ये सहभागी होण्याकरिता 11 वाजता दिल्लीला जायला निघतील. तसेच नितीश कुमार यांच्या फ्लाईटमधूनच तेजस्वी यादव देखील दिल्लीला जात आहे.
महाराष्ट्रातून सीएम एकनाथ शिंदे देखील दिल्लीमध्ये होणाऱ्या NDA च्या बैठकीमध्ये सहभागी होतील. अजित पवार गटामधून प्रफुल्ल पटेल तर नागपूरमधून नितीन गडकरी दिल्लीला जातील तर नारायण राणे देखील या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे.
तसेच उद्धव ठाकरे आज इंडिया च्या बैठकीसाठी दिल्लीला नाही जाणार. तर त्यांच्या ऐवजी संजय राऊत बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. तसेच शरद पवार, सुप्रिया सुळे हे देखील दिल्लीला बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. .