गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 20 एप्रिल 2024 (20:48 IST)

आमदारांचा आकडा आम्हाला जुळवला तर मी मुख्यमंत्री बनू शकतो-अजित पवार

ajit pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पवार अशी लढत निश्चित झाली आहे. सुप्रिया सुळे यांचा प्रचार कालपासून सुरू झालं, तर सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केले. यावेळी पवार यांनी खासदार शरद पवार यांच्यासह आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
 विशेष मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. "आमचा पक्ष सेक्युलर आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे, त्यावरच आम्ही पुढे जात आहे. आमच्या या विचारावर कोणीही आक्षेप घेतलेला नाही, आम्हाला २००४ सारखे आमदार निवडणून आणायचे आहेत.जर मला महाराष्ट्राने पाठिंबा दिला, आमदारांनी पाठिंबा दिला १४५ आमदारांचा आकडा आम्हाला जुळवला तर मी मुख्यमंत्री बनू शकतो, असंही अजित पवार म्हणाले.

Edited by -Ratnadeep Ranshoor