suvichar
✕

पुण्यात ‘मविआ- वंचित’ लढत लक्षवेधी

Updated: गुरूवार, 4 एप्रिल 2024 (17:39 IST)
 
पुणे शहर लोकसभा मतदार संघात महायुतीचे म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ महाविकास आघाडीचे काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर आणि मनसे मधुन बाहेर पडलेले वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
 
मनसे मधून बाहेर पडल्यावर मोरे यांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधला होता पण अखेर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे यापूर्वी त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी केली होती.
 
तर शिरूर लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील याच्यात तिरंगी लढत होणार आहे.
 
बारामती लोकसभा मतदार संघात होर्णार्‍या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीला पांिठबा जाहीर केला आहे तर राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
 
भावजय आणि नणंद अशी लढत होत असल्याने उत्सुकता वाढली आहे तर मावळ लोकसभा मतदार संघात आतातरी दोन उमेदवार समोरा समोर उभे असल्याचे दिसते आहे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि संजोग वाघिरे पाटील यांच्यामध्ये लढत रंगणार आहे.
 
उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे पण उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर प्रचार मोहिमेला अधिक वेग येणार आहे.
 
Edied by Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

ई-केवायसीच्या अडथळ्यामुळे १४,९७६ शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

LIVE: मुंबईकरांसाठी बीएमसीची नवी डिजिटल सुविधा! ‘हॅलो ए वॉर्ड’ एआय चॅटबॉट सुरू

CJP आंदोलनाचे नेतृत्व आता अजिंक्य शिंदेकडे

दिल्लीतील आंदोलकांच्या अटकेमुळे सोनम वांगचुक संतप्त, उपोषण आणि पायी मोर्चाचा इशारा

तुम्ही हवे तितके पोलीस बोलवा, आम्ही मागे हटणार नाही..." - राहुल गांधींचा मोदी सरकारवर मोठा हल्ला

पुढील लेख
Show comments