विमानने प्रवास करून चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात!
विमानाने प्रवास करून पुण्यात येऊन चोरी करून पसार होणाऱ्या एका टोळीला पुणे बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या टोळीला आरटीओ जवळील एका मॉल मध्ये चोरी करण्याचा आरोपाखाली अटक केली आहे. ही टोळी राजस्थानची असून चक्क विमानाने प्रवास करून चोरी करण्यासाठी आली होती. पोलिसांनी या प्रकरणात चौघांना अटक केली आहे. हे चौघे राजस्थानातील रहिवासी असून मोठ्या मोठ्या मॉल मधून कपडे, बूट, असे करायचे. त्यांच्या कडून 1.54 लाख रुपयांच्या वस्तू चोरल्याचे उघडकीस आले आहे.
या चोरट्यांपैकी दोघे जण पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना सुरक्षा रक्षकाने त्यांना अडवलं आणि त्यांचं बिंग फुटलं. त्यांच्या कडून एका कार मध्ये चोरी केलेला माल ताब्यात घेतला आहे. तसेच या प्रकरणामधील मुख्य आरोपीला पोलिसांनी एका हॉटेल मधून ताब्यात घेतलं आहे.
हे आरोपी विमानाने जयपूरहून मुंबईत आले. तिथे ते मोठ्या मोठ्या मॉल मध्ये जाऊन चेंजिंग रूम मध्ये जाऊन कपड्यांवरील बार कोड कडून कपडे चोरायचे.नंतर ते पुण्यात आले. त्यांच्या कडे अनेक चोरलेल्या वस्तू आढळल्या आहे. अशा प्रकारे पोलिसांनी या टोळीला जेरबंद केले. पुढील तपास पोलीस करत आहे.
Edited by - Priya Dixit