1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 20 मार्च 2024 (14:38 IST)

विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवून घेतलं, तरुणीचा मृत्यू

suicide
पुण्यातील एका नामांकित कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये कॅंटीनच्या कर्मचाऱ्याची छेडछाड  आणि व रूम मॅटच्या जाचाला कंटाळून तरुणीने टोकाचे पाऊल घेत स्वतःला पेटवून घेतल्याची दुर्देवी घटना घडली आहे. रेणुका बालाजी साळुंके असे या तरुणीचे नाव आहे. 

सदर घटना 7 मार्चची पुण्यातील एका नामांकित कॉलेजच्या होस्टेलची आहे. तरुणी हॉस्टेल मध्ये राहत होती. होस्टेलच्या कॅंटीन मधील एक कर्मचारी तिला सतत आक्षेपार्ह मेसेज करायचा या सर्व प्रकारामुळे ती खूप घाबरली होती.  शिवाय तिची रूम मेट देखील तिला त्रास द्यायची. या दोघांच्या त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल घेत स्वतःला बाथरूम मध्ये पेटवले. तिला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेमुळे तिचं  शरीर खूप भाजलं होत. डॉक्टरांनी तिला वाचविण्याचे खूप प्रयत्न केले  उपचाराधीन असता तिचा दुर्देवी मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणी होस्टेलच्या कर्मचाऱ्याच्या आणि रूम मॅटच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
 
Edited by - Priya Dixit