शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2024 (19:06 IST)

मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण नाही केली, शरद पवारांचा मोदींवर पलटवार

narendra modi sarad panwar
शरद पवारांनी मोदींवर टीका करत निशाणा साधला आहे. ते म्हणाले पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये जनतेला सात दिवसांत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्याचे वचन दिले जे त्यांनी पूर्ण केले नाही. गॅस सिलिंडरच्या किमती 400 रुपयांवरून 50 टक्क्यांनी कमी करण्याचे आश्वासन दिले होते. आज सिलिंडरच्या किमती 1160 रुपये आहे. महागाई वाढतच आहे. 

शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधत म्हणाले मोदींनी अनेक आश्वासने दिली मात्र ती पूर्ण केले नाही. मोदी त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहे. लोक पंतप्रधान मोदींवर नाराज आहे. 
पंतप्रधान मोदी स्वतःच्या आणि मनमोहन सिंग यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळाची तुलना करतात पण मनोहनसिंग यांचे वैशिष्टये होते की ते शांतपणे काम करायचे आणि कोणताही गोंधळ न करता देशापुढे निकाल द्यायचे. 
ते पुढे म्हणाले की मला मोदींच्या कामाच्या परिणामाचे काही माहित नाही पण त्यांचा बराच वेळ टीका, निदा करण्यातच जातो. 

त्यांनी स्वतःच्या परिवाराकडे लक्ष दिले नाही. मी त्यांच्या खासगी आयुष्यावर काहीच बोलणार नाही. 
पंतप्रधान मोदी म्हणाले उद्धव ठाकरे माझे शत्रू नाही. संकटकाळात त्यांना मदत   करणारा  मी पहिला  व्यक्ती असेंन या वर उत्तर देताना शरद पवार म्हणाले त्यांनी लाख सांगितले असतील पण उद्धव ठाकरे यांच्यावर मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये अशी देवाकडे प्रार्थना करतो.   
 
 Edited By- Priya Dixit