सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 20 मे 2024 (09:53 IST)

एकाच तरुणाने केले 8 वेळा मतदान!एफआयआर नोंदवला

fake vote
Man cast vote 8 times : लोकसभा निवडणुकीत एका व्यक्तीने 8 वेळा मतदान केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
 
माहिती देताना उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा म्हणाले की, घटनेचा एफआयआर एटा जिल्ह्यातील नयागाव पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम171-एफ आणि 419, आरपी कायदा 951 च्या कलम 128, 132आणि 136 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये अनेक वेळा मतदान करताना दिसणारा व्यक्ती राजन अनिल  सिंग असून, खिरिया पमरण गावातील रहिवासी असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
 
मतदान पक्षाच्या सर्व सदस्यांना निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. संबंधित मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याची शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. यूपीच्या उर्वरित टप्प्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मतदारांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
 
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण कथितपणे 8 वेळा भाजपला मतदान करत असल्याचा व्हिडिओ बनवत आहे.
 
Edited by - Priya Dixit