शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 12 मे 2024 (14:04 IST)

या पुढे निवडणूक लढवणार नसल्याची ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची घोषणा

eknath khadse
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी या पुढे ते निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले मी या पुढे निवडणूक लढवणार नाही. मला आता निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकत. मी काही राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. माझा कल निवडणूक लढवण्याकडे नाही. मी अजून पाच वर्ष विधान परिषदेचा आमदार आहे. मी राजकीय माणूस असून अद्याप राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही. मी शरद पवारांचा पक्ष सोडला तेव्हा पक्ष सोडताना काय सांगितलं हे सांगणार नाही. काही गोष्टी राखीव  ठेवाव्यात असे मला वाटते.
 
भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत ते म्हणाले, भाजपचे केंद्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे की एकनाथ भाऊ भाजपमध्ये प्रवेश करणार. काही लोकांना मी भाजप मध्ये येणार यासाठी नाराजगी होती. काही लोक दुखावले जातात. लोंकांच्या नाराजगीचा परिणाम पक्ष प्रवेशावर होतो. नाराज असणाऱ्यांची नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न  करत असल्याचे ते म्हणाले.   
 
Edited by - Priya Dixit