बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 एप्रिल 2024 (13:05 IST)

मतदान कार्डशिवाय मतदान करा!

सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. देशामध्ये आता दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तुम्ही मतदान कार्डाशिवाय देखील मतदान करू शकाल. चला जाणून घेऊ या लोकसभा निवडणूक मध्ये तुम्ही मतदान कार्डाशिवाय कसे मतदान करू शकाल. 
 
लोकसभा निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला आहे. या टप्प्यात देशातील 13 राज्यांमध्ये आणि 88 क्षेत्रांमध्ये लोक मतदान करतील. निवडणुकीचा हा भाग भारताच्या लोकतंत्रासाठी महत्वपूर्ण आहे. लोकसभेचे निकाल 4 जूनला समजतील. मत देताना तुमच्याजवळ मतदान कार्ड असणे गरजेचे असते जर तुमचे मतदान कार्ड हरवले असेल तर, भारतीय निवडणूक आयोग मते तुम्ही मत देऊ शकाल. 
 
तुम्ही मतदान कार्डाशिवाय देखील मतदान करू शकाल. याकरिता तुम्हाला मतदाता सूचीमध्ये आपले नाव पाहावे लागेल. तसेच तुम्ही पासपोर्ट, आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्राइव्हिंग लायसन्स, फोटोयुक्त पेंशन कार्ड, केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी आईडी कार्ड हे मतदान केंद्रावर यापैकी कोणतेही ओळखपत्र दाखवून मतदान करू शकाल. जर तुमचे नाव यादीत नसेल तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पंजीकरण करू शकतात.