उद्या पहिल्या टप्प्यात मतदान!
लोकसभा निवडणूक 2024 : देशातील 102 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. तसेच केंद्रीय मंत्रांच्या 8 जागांचा समावेश त्यामध्ये आहे. उद्या जितेंद्र सिंह, सर्बानंद सोनोवाल, नितिन गडकरी, किरेन रिजिजू, भूपेन्द्र यादव, अर्जुन राम मेघवाल भवितव्य मतपेटीमध्ये बंद होईल. बुधवारी संध्याकाळी पहिल्या टप्य्यात मतदानाचा प्रचार संपला. देशभरात 102 जागांवर मतदान होणार असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच जागांचा समावेश आहे. 19 एप्रिल रोजी भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर रामटेक, नागपूर आणि चंद्रपूर या जागांसाठी मतदान होणार आहे. उद्या सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लोकसभेच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.
61 संवेदनशील मतदान केंद्रे नागपूर लोकसभा मतदारसंघात आहे. तसेच 63 मतदान केंद्रे रामटेक लोकसभा मादानकेंद्रात आहेत. तसेच एकूण 4510 मतदान केंद्र नागपूर आणि रामटेक मतदारसंघात आहे. रामटेकमध्ये 2405 मतदान केंद्र तर नागपूर लोकसभा मतदारसंघात 2105 मतदारसंघ केंद्रे आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात 22 लाख 23 हजार 281 मतदारांची नोंदणी झाली असून, नागपूर आणि रामटेक या दोन्ही मतदारसंघात 42 लाख 72 हजार 366 मतदार आहे. देशातील 102 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.
Edited By- Dhanashri Naik