रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024 (11:00 IST)

नाशिकच्या हॉटेलमधून मतदानापूर्वी कोट्यवधींची रोकड जप्त

Nashik News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यात उद्या 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. या काळात निवडणुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आणि निवडणूक आयोगाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी नाशिकमधील पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान नाशिकमधील एका हॉटेलमधून 1.98 कोटी रुपये जप्त केले आहे. आदर्श आचारसंहिता लागू होऊनही गेल्या काही दिवसांत अशी आणखी प्रकरणे समोर आली आहेत.
 
नाशिकचे जिल्हाधिकारी  म्हणाले की, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार तेथून 1.98 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. टीम पुढील कारवाई करत आहे.  
 
निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या वेळी जप्त केलेल्या पैशाच्या मालकाला नोटीस दिल्या नंतर त्यांची चौकशी केली जाईल, व प्रश्नांची योग्य उत्तरे न दिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

Edited By- Dhanashri Naik