गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024 (10:29 IST)

कॅफेच्या केबिनमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, तीन आरोपींना अटक

crime against women
Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सदर पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या एका कॅफेमध्ये 11 वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार 19 वर्षीय तरुणी 11 नोव्हेंबर रोजी कॉलेजमध्ये जात असताना तिच्या ओळखीच्या तरुणाने तिला एका कॅफेमध्ये नेले आणि तेथे त्याने इतर दोन जणांना देखील बोलावले आणि तिघांनीही केबिनमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.  
 
यासंदर्भात पोलिस स्टेशनचे प्रभारी  यांनी सांगितले की, पीडितेचे जबाब नोंदवण्यात आले असून आरोपींची ओळख पटल्यानंतर त्यांना रविवारी अटक करण्यात आली.  

Edited By- Dhanashri Naik