बुधवार, 16 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: बुधवार, 16 ऑक्टोबर 2024 (09:59 IST)

विधानसभा निवडणूक: महिला बुरखा घालून मतदान करू शकतील का? निवडणूक आयुक्तांनी दिले उत्तर

Voting
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुक 2024 तारीख जाहीर झाली असून यावेळी महिला बुरखा घालून मतदानाला जाऊ शकतात का? त्यासाठी काय नियम आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयुक्तांनी मंगळवारी दिली.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसंदर्भात मंगळवारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेण्यात आली. तसेच निवडणूक आयोगाने दोन्ही राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहे. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. यातील एक प्रश्न असा होता की महिला बुरखा घालून मतदान करू शकतात का? त्यासाठी काय नियम आहेत? त्यावर निवडणूक आयुक्तांनी उत्तर दिले. तर या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, निवडणूक संचालन नियम 35 मध्ये विशेषत: मतदारांच्या ओळखीचा उल्लेख आहे आणि 34 मध्ये महिला मतदारांसाठी असलेल्या सुविधांचा उल्लेख आहे. समान नियमांनुसार मतदार ओळखले जातील, परंतु त्या भागातील सांस्कृतिक पैलूंचा पूर्ण आदर केला जाईल आणि विचारात घेतला जाईल.
 
ते म्हणाले की, 'राजस्थानसारख्या अनेक राज्यांमध्ये, देशाच्या अनेक भागात काही मुद्दे समोर येतात. ओळख नियमानुसार केली जाईल आणि त्या विशिष्ट क्षेत्राच्या सांस्कृतिक मूल्याचा शक्य तितका आदर केला जाईल.
 
नियम काय सांगतात?
नियमानुसार उमेदवाराला कोणत्याही प्रकारची शंका असल्यास तो निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकतो. तसेच नियमानुसार, मतदान केंद्रावर अशी तपासणी करण्याचा अधिकार निवडणूक अधिकारी किंवा पोलिंग एजंटला आहे. उमेदवार असा तपास करू शकत नाही. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांसाठी निवडणूक होणार आहे. तर झारखंडमधील विधानसभेच्या 81 जागांसाठी 13 आणि 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.