रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: रविवार, 8 सप्टेंबर 2024 (15:45 IST)

माझ्या मुली जावयाने विश्वासघात केला असून त्यांना नदीत फेकून द्या, धर्मरावबाबां आत्राम यांचे खळबळजनक वक्तव्य

atram
महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते धरमरावबाबा आत्राम यांनी मुली आणि जावयाबाबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, माझ्या मुलीने आणि जावयाने माझा विश्वासघात केला असून त्यांना प्राणहिता नदीपात्रात त्यांना फेकण्याची विनंती अहेरी विधानसभा मतदारांना केली आहे. 

धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री हिने वडिलांच्या विरोधात जाऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याच्या बातम्या येत आहे. 

मुली जावया बद्दलचे खळबळजनक वक्तव्य आत्राम यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत केले. 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी बंडखोरी आणि पक्ष फोडीच्या राजकारणांनंतर अनेक राजकीय घरात फूट पडत आहे. महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री  अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या मुली आणि जावयाबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. 

धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आणि जावई ऋतुराज हलगेकर हे शरद पवार गटात सामील होण्याची चर्चा असून भाग्यश्री आपल्या वडिलांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 
 
ते म्हणाले, शरद पवारांच्या गटातील नेत्यांना आमच्या घरात फूट पाडण्याचे काम करत आहे. त्यांना माझ्या मुलीला माझ्या विरोधात उभे करायचे आहे. माझ्या मुलीवर आणि जावयावर विश्वास ठेऊ नका. त्यांनी माझी फसवणूक केली असून त्यांना प्राणहिता नदीपात्रात फेकून दिले पाहिजे. जी आपल्या वडिलांची झाली नाही ती इथल्या जनतेशी कशी होईल.असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 
Edited By - Priya Dixit