मंगळवार, 17 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 (11:26 IST)

बिहारमध्ये सासूने सतत मोबाईल पाहते म्हणून रागावले, दुखावलेल्या सुनेने केली आत्महत्या

suicide
बिहार मधील पश्चिम चंपारण जिल्ह्याच्या चनपटिया स्टेशनच्या चुहेडी बाजार मध्ये सोमवारी एका घटना घडली आहे. सतत मोबाईल वापरते म्हणून सासूने सुनेला रागावले. तर सुनेने गळफास घेत आत्महत्या केली आहे.  
 
मिळलेल्या माहितीनुसार सासूने सांगितले की, मी तिला रागावले की सतत मोबाईल पाहू नको. यानंतर ती रूम मध्ये निघून गेली. नंतर तिच्या खोलीचे दार आतून बंद होते. खिडकीतून आतमध्ये पहिले तेव्हा सून पंख्याला फाशीच्या फंद्यात लटकलेली दिसली. 
 
पोलिसांनी सांगितले की, जवळपासच्या लोकांनी दरवाजा तोडून सुनेला खाली उतरवले व तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पण चिकिस्तकांनी तिला मृत घोषित केले. तसेच पोलिसांनी सुनेच्या माहेरी घडलेल्या घटनेची सूचना दिली असून पुढील चौकशी सुरु आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवला व पुढील चौकशी सुरु आहे. 

Edited By- Dhanashri Naik