बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: सोमवार, 18 नोव्हेंबर 2024 (15:08 IST)

गडकरींनी काँग्रेसचे संविधान बदलण्याचे आरोप फेटाळले

महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यात सर्वत्र निवडणुका होणार असून येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या साठी सर्व पक्षांचे बडे नेते निवडणुकीचे प्रचार करत आहे. या रविवारी ठाणे शहरात झालेल्या निवडणुकीच्या सभेत भाजपने संविधान बदलण्याचा काँग्रेसच्या आरोपाला फेटाळून लावले आहे. 

ते म्हणाले, कोणतीही सरकार संविधानाची मुख्य वैशिष्टये बदलू शकणार नाही. आणीबाणी नंतर भाजप पक्षाने त्या दुरुस्त्यांना मागे घेतल्या. भाजपचे लक्ष राज्यघटनेचे रक्षण आणि विकासावर आहे आणि पक्ष कोणतीही घटनाविरोधी पावले उचलत नाही.

देशातील जलद शहरीकरणाच्या संदर्भात, शाश्वत पायाभूत सुविधा निर्माण करणे हे त्यांच्या सरकारचे प्राधान्य आहे, जेणेकरून लोकांचे जीवनमान सुधारता येईल. गडकरींनी मतदारांना जातीच्या राजकारणाच्या वरती उठून विकासाला प्राधान्य देण्याचे आणि पुरोगामी दृष्टिकोन ठेवून काम करणारे प्रतिनिधी निवडण्याचे आवाहन केले.
Edited By - Priya Dixit