गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 18 नोव्हेंबर 2024 (21:36 IST)

शिंदे सरकारची नवी योजना करते महिला मतदारांना आकर्षित

maharashtra election
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates in Marathi: विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी असून महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते..
 

09:33 PM, 18th Nov
मुंबईसह अनेक शहरांमध्ये चार दिवस ड्राय डे जाहीर
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महिन्यात मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये  ड्राय डे पाळले जाणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (EC) सुव्यवस्थित मतदान सुनिश्चित करण्यासाठी हे ड्राय डे अनिवार्य केले आहेत.सविस्तर वाचा ......

08:52 PM, 18th Nov
एनसीपी नेता छगन भुजबल यांचा बटेंगे तो कटेंगे घोषणेला विरोध
महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी भाजपच्या  बटेंगे तो कटेंगे घोषणेला विरोध केला.सविस्तर वाचा 

07:34 PM, 18th Nov
राहुल गांधी ज्या पद्धतीने बोलतात, त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही... नितीन गडकरीं यांचा राहुल गांधी यांना टोला
राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राहुल गांधी यांना त्यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोणीही गांभीर्याने घेऊ नये. 

06:53 PM, 18th Nov
जळगावात अपक्ष उमेदवार शेख अहमद यांच्या घरावर गोळीबार
राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपला. 

06:39 PM, 18th Nov
मतदान केंद्रावर मोबाईलवर बंदीचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
येत्या 20 नोव्हेंबर रोजी निवडणुका आहे आणि मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले की 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदान केंद्रावर मोबाईल फोनच्या वापरावर बंदी

06:13 PM, 18th Nov
धारावीची जमीन आम्ही कोणाला दिली नाही, भाजपचा  काँग्रेसवर जोरदार प्रहार
मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बदनामीकारक मोहीम चालवल्याचा आरोप भाजपने केला आहे.सविस्तर वाचा .....

04:47 PM, 18th Nov
आमच्या तुकड्यांवर वाढणारे आमच्याशी लढायला येताय...अबू आझमींचा नवाब मलिकांवर निशाणा
सपाचे उमेदवार अबू आझमी यांनी नवाब मालिकांवर निशाणा साधत म्हणाले. हे आमच्या तुकड्यांवर वाढले आता ते आमच्याशी लढायला आले आहे. सविस्तर वाचा

03:28 PM, 18th Nov
गडकरींनी काँग्रेसचे संविधान बदलण्याचे आरोप फेटाळले
महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यात सर्वत्र निवडणुका होणार असून येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या साठी सर्व पक्षांचे बडे नेते निवडणुकीचे प्रचार करत आहे.सविस्तर वाचा 

02:28 PM, 18th Nov
महाराष्ट्रातील प्रकल्प इतर राज्यांना दिले-राहुल गांधींचा महायुती सरकारवर मोठा आरोप
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी मुंबईत केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारवर अनेक मोठे आरोप केले आहे. सविस्तर वाचा

01:22 PM, 18th Nov
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीचा आज महाराष्ट्र दौरा
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. येथे ते चार वेगवेगळ्या रॅलीत सहभागी होणार आहे. सविस्तर वाचा

12:30 PM, 18th Nov
मुंबईत वॉटर टॅक्सी सुरू होणार, 17 मिनिटांत नवी मुंबई विमानतळावर पोहोचणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, प्रस्तावित वॉटर टॅक्सी सेवेमुळे लोक मुंबईतील कोणत्याही ठिकाणाहून आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 17 मिनिटांत पोहोचू शकतील. सविस्तर वाचा

12:27 PM, 18th Nov
'माझ्याशी पंगा घेऊ नका...', शरद पवारांचे समर्थकांना आवाहन
महाराष्ट्र निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवसांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना बंडखोर म्हणत त्यांचा पराभव करा, असे आवाहन शरद पवार यांनी समर्थकांना केले आहे. सविस्तर वाचा  

12:10 PM, 18th Nov
राहुल यांचा 'एक हैं तो सेफ हैं' मोदींच्या या घोषणेवर मोठा हल्ला, धारावी आणि अदानींच्या नावांनी घेरले
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्वांसमोर तिजोरी ठेवली. त्यावर लिहिले होते, 'एक हैं तो सेफ हैं'. त्यांनी तिजोरीतून दोन पोस्टर बाहेर काढले. त्यातील एका बाजूला उद्योगपती गौतम अदानी आणि पीएम मोदींचे तर दुसऱ्या बाजूला धारावी प्रकल्पाचे फोटो होते. हे दाखवत राहुल म्हणाले की, हे असे आहे - जर पीएम मोदी का एक हैं तो सेफ हैं. सविस्तर वाचा

10:50 AM, 18th Nov
चिराग पासवान यांचा काँग्रेसवर मोठा आरोप, म्हणाले-डॉ.भीमराव आंबेडकरांचा अपमान केला

10:49 AM, 18th Nov
मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही- एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरून मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात महायुतीचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित असले तरी आपण या शर्यतीत नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

10:13 AM, 18th Nov
वाशिम मध्ये MVA चा तणाव वाढला, शिवसेना UBT चे उमेदवार राजा भैय्या पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहे. मतदानाच्या अवघ्या तीन दिवस आधी शिवसेनेचे बंडखोर यूबीटी उमेदवार राजा भैय्या पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
 

10:12 AM, 18th Nov
सांगलीमध्ये भाजप-आरएसएस बद्दल मल्लिकार्जुन खरगे यांचे वादग्रस्त विधान

10:10 AM, 18th Nov
सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने काँग्रेसच्या हाती सत्ता दिली मालेगावमध्ये गरजले एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी मालेगाव येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना सत्तेची एवढी लालूच होती की त्यांनी शिवसेना काँग्रेसला दिली.