गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: सोमवार, 18 नोव्हेंबर 2024 (18:49 IST)

जळगावात अपक्ष उमेदवार शेख अहमद यांच्या घरावर गोळीबार

राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपला. 

जळगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगाव शहरात एका अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. याघटने मुळे परिसरात खळबळ उडाली आहे.एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख अहमद हुसेन गुलाम हुसैन हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. 
 
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन यांच्या घरावर सोमवारी पहाटे चारच्या सुमारास अज्ञातांनी 3 गोळ्या झाडल्या.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. 
 
शेख यांनी घराची तपासणी केली असता त्यांना खिडक्यांचे काच तुटलेले दिसले. या घटनेने शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन यांना झोपेतून जागे केले, पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना 3 रिकामी काडतुसे आढळून आली.
 
पोलीस या घटनेचा तपास करत असून गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन यांना पोलिस संरक्षण देण्यात येणार आहे. आरोपींचा शोध सुरू असून लवकरच हल्लेखोरांना पकडले जाईल असे पोलिसांनी सांगितले.
Edited By - Priya Dixit