सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (15:24 IST)

अमित शहांची उद्धव ठाकरेंवर धुळ्यात टीका, सत्तेच्या लालसेपोटी आता कुणासोबत आहे?

amit shah
Amit Shah News : केंद्रीय मंत्री अमित शहा आज 13 नोव्हेंबर धुळ्यामध्ये रोजी जाहीर सभेला संबोधित करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील धुळे येथे जाहीर सभेत बोलताना महाविकास आघाडीवर पुन्हा निशाणा साधला. महाविकास आघाडी आणि महायुतीचा अर्थ त्यांनी स्पष्ट केला. धुळ्यात जनतेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, महायुती म्हणजे विकास आणि आघाडी म्हणजे विनाश. विकास आणणाऱ्यांना सत्तेवर आणायचे की विनाश घडवणाऱ्यांना हे आता जनतेने ठरवायचे आहे, असे अमित शहा यांनी जनतेला सांगितले.
 
जनतेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले की, महाविकास आघाडीला फक्त खुश करायचे आहे. सत्ता मिळवण्याच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे आज कोणासोबत बसले आहे? असा आरोप त्यांनी केला.
 
तसेच धुळे येथे जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, “आघाडीला महाविकास आघाडी फक्त तुष्टीकरण हवे आहे. सत्ता मिळवण्यासाठी उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंची सर्व तत्त्वे विसरले आहे. असा निशाणा अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर साधला आहे.  

Edited By- Dhanashri Naik