शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (10:16 IST)

महायुतीने मुंबई राहण्यायोग्य केली-अमित शाह

Mumbai News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी मुंबईमध्ये मुंबईबद्दल मोठे वक्तव्य केले. त्यामुळे निवडणुकीच्या वातावरणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. अमित शहा म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने मुंबई राहण्यायोग्य केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महायुतीच्या नेत्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपचे खासदार, आमदार आणि इतर केंद्रीय नेते मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करीत आहे. 
 
तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी मुंबईत मुंबईबाबत मोठे विधान केले. त्यामुळे निवडणुकीच्या वातावरणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. घाटकोपर-पूर्व येथील भाजपचे उमेदवार पराग शहा यांच्या समर्थनार्थ आयोजित जाहीर सभेत गृहराज्यमंत्री म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने मुंबईला राहण्यायोग्य केले आहे.
 
यावेळी पराग शहा यांच्या संकल्प पत्राचेही अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यानंतर त्यांनी कांदिवली येथे उत्तर मुंबई विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या समर्थनार्थ सभेला संबोधित केले.