गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (10:01 IST)

अचलपूरमध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसला योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर

Yogi adityanath
Yogi Adityanath News : महाराष्ट्र निवडणुकीसंदर्भात अमरावतीच्या अचलपूर विधानसभेत निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना चोख प्रत्युत्तर दिले.
 
मिळालेल्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिप्पणी केली होती. ते म्हणाले होते की, काही लोक भगवे कपडे घालून राजकारणात आले असून देशात द्वेष पसरवत आहे, असे खरगे म्हणाले होते. 
 
यावर योगी म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून मी खरगे यांचे म्हणणे ऐकत आहे. मी योगी आहे आणि माझ्यासाठी राष्ट्र सर्वोच्च आहे. तुमच्यासाठी काँग्रेसचे तुष्टीकरणाचे राजकारण सर्वोच्च आहे. काँग्रेसचे तुष्टीकरण धोरण तुमच्यासाठी पहिले आहे, त्यामुळेच तुम्हाला खरे बोलता येत नाही, असा टोला योगिनीं खरगेंना लगावला.