गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Updated : गुरूवार, 7 नोव्हेंबर 2024 (18:32 IST)

ज्यांना बजरंगबली आवडत नाही त्यांनी पाहिजे तिथे जावे, महाराष्ट्रात गरजले योगी आदित्यनाथ

yogi adityanath
Yogi Adityanath news : महाराष्ट्रात वाशिम, अमरावती आणि अकोला येथे महायुती उमेदवारांच्या समर्थनार्थ जाहीर सभांना संबोधित करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठे वक्तव्य केले. ज्यांना बजरंगबली आवडत नाही त्यांनी हवं तिथे जावं असं योगी म्हणाले.
 
मिळालेल्या माहितीनुसार योगी आदित्यनाथ म्हणाले की ज्यांना भगवान बजरंगबली आवडत नाहीत त्यांनी पाहिजे तिथे जावे. तसेच “भारतात असा कोण आहे जो भगवान राम आणि बजरंगबलींवर विश्वास ठेवत नाही? त्रेतायुगात भगवान बजरंगबली असताना इस्लामची संकल्पनाही अस्तित्वात नव्हती. लोकांना रामनवमी मिरवणूक काढण्यापासून किंवा हनुमान चालीसा वाचण्यापासून का रोखले जात आहे? असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांनी विचारला आहे. 
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकरिता वाशिम, अमरावती आणि अकोला येथे महायुती उमेदवारांच्या समर्थनार्थ जाहीर सभांना संबोधित केले.