सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: गुरूवार, 7 नोव्हेंबर 2024 (16:50 IST)

8 नोव्हेंबर रोजी PM नरेंद्र मोदींची धुळ्यामध्ये होणार पहिली निवडणूक रॅली

modi
विधानसभा निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली निवडणूक रॅली शुक्रवार 8 नोव्हेंबर रोजी धुळे शहरातील गोशाळा मैदानावर होणार आहे.   
 
मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे स्टार प्रचारक पीएम मोदी 5 उमेदवार आणि मालेगाव बाह्य मतदारसंघातील एका उमेदवाराच्या समर्थनार्थ धुळ्यामध्ये येणार आहे. पंतप्रधानांच्या रॅलीसाठी उद्या धुळ्यामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
 
तसेच यासोबतच संमेलनस्थळाचा परिसर नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आला असून सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहे.