बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (09:20 IST)

मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्याला रोखून देशद्रोही म्हणण्याचा व्हिडिओ व्हायरल

eknath shinde
Chief Minister Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न केल्याची घटना महाराष्ट्रात समोर आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना देशद्रोही म्हणण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शिवसेना तोडण्यासाठी आणि भाजपला सत्तेसाठी पाठिंबा दिल्याबद्दल एक तरुण त्यांना 'देशद्रोही' म्हणतांना आढळला आहे. 
 
विधानसभेच्या मतदानाच्या आठवडाभर आधी समोर आलेला हा व्हिडिओ राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ मुंबईतील साकीनाका भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच एका तरुणाने काळे झेंडे दाखवत शिंदे यांच्या ताफ्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत असून त्यांना देशद्रोही म्हटले आहे. या घटनेनंतर शिंदे यांना त्यांचा ताफा थांबवून वाहनातून बाहेर पडावे लागले. तरुणाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे एका अधिकारींनी सांगितले. काही वेळाने त्याला सोडण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे.