संबंधित माहिती
- राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक यांचा प्रचार करण्यास भाजपचा नकार
- भाजप महाराष्ट्राच्या निवडणुका एकट्याने जिंकू शकत नाही, देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले
- नवाब मलिक यांचा मुंबईतील मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल
- Maharashtra Assembly Elections 2024: बारामतीत शरद पवारांकडून अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल
- अजित पवार यांनी प्रचाराचा नारळ फोडला, साहेबांनी कुटुंबात फूट पाडली म्हणत शरद पवारांवर घणाघात
मनोज जरांगे पाटीलांनी घेतला मोठा निर्णय, या मतदार संघातून निवडणूक लढवणार
सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल सर्वत्र वाजत असून मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे या साठी मनोज जरांगे पाटील लढत आहे.
सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल सर्वत्र वाजत असून मनोज जरांगे पाटीलांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मराठा समाजाचा उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
ते बीड, जालना, छत्रपती सम्भाजी नगर, फुलंब्री या मतदार संघातून निवडणूक लढवणार अशी घोषणा केली असून केज गेवराई आणि आष्टी मतदारसंघाबाबत स्थानिकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. असे ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा करण्याआधीच पत्रकार परिषद घेतली.
आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन ते कोणत्या मरदारसंघातून लढवणार ते सांगणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे हे बीड मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. तसेच जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे संध्याकाळी पत्रकार परिषेदत ते जाहीर करणार आहे.
Edited By - Priya Dixit
