बुधवार, 26 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Updated : मंगळवार, 29 ऑक्टोबर 2024 (18:26 IST)

वरळी विधानसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला

Milind Deora filed an application against Aditya Thackeray
20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील 288 सदस्यीय विधानसभेसाठी निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे . मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.स्पर्धेतून माघार घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर आहे.निवडणुकाच्या तयारीला सर्व राजकीय पक्ष लागले असून उमेदवार अर्ज दाखल करत आहे. 

वरळी विधानसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला.मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात मोठ्या लढतीची तयारी झाली आहे आणि ते शिवसेनेचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी लढतील. काँग्रेसचे माजी नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री देवरा यांनी या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि नंतर राज्यसभेवर निवडून आले. राज्यसभेवर सहा वर्षांचा कार्यकाळ असतानाही देवरा यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या विरोधात रिंगणात उतरवले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने पक्षाकडून 
उमेदवारांची दुसरी यादी रविवारी जाहीर करण्यात आली. या यादीत मिलिंद देवरा यांना वरळी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.या नंतर मिलिंद देवरायांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. 
 
मिलिंद देवरा यांची लढत शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे यांच्याशी होणार आहे. 
मनसेचे संदीप देशपांडे यांनी देखील वरळी मतदार संघातून उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यामुळे आता तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. 
Edited By - Priya Dixit