सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑक्टोबर 2024 (20:16 IST)

Maharashtra Election 2024:अजित पवार यांचा बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल

20 नोव्हेंबर रोजी 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे, तर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे.या पूर्वी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे.मंगळवार,29 ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस असल्यामुळे राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला. 
 
आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

या वेळी अजित पवार यांच्या समोर बारामतीतून शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार हे देखील निवडणूक लढवणार आहे. यंदाची निवडणूक बारामतीत काका अजित पवार आणि पुतण्या युगेंद्र पवार यांच्या मध्ये होणार आहे. 
लोकसभा निवडणुकींनंतर बारामतीत पुन्हा एकदा काका आणि पुतण्यामध्ये संघर्ष होताना दिसत आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून या वेळी शरद पवार तिथे उपस्थित होते. 

अजित पवारांनी अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन केले.त्यांनी दोघांनीअर्ज दाखल करण्यापूर्वी ग्राम दैवत कन्हेरीच्या मारुतीचे दर्शन घेतले. 

अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. जेव्हा जेव्हा माझ्या विरोधात उमेदवार उभा केला जातो तेव्हा मी त्याला मजबूत उमेदवार मानतो आणि त्यानुसार प्रचार करतो. यावेळीही बारामतीची जनता मला निवडून देईल आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.
Edited By - Priya Dixit