बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: रविवार, 17 नोव्हेंबर 2024 (17:20 IST)

शिवसेनेच्या यूबीटी कार्यकर्त्यांवर नवनीत राणा यांचा आरोप

navneet rana
माजी लोकसभा खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते नवनीत राणा यांनी रविवारी अमरावतीमधील दरियापूर मतदारसंघातील खल्लार गावात त्यांच्या सभेवर झालेल्या हल्ल्यामागे शिवसेना (यूबीटी) कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला. अमरावतीच्या खल्लार गावात शनिवारी भाजपचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या जाहीर सभेत नवनीत राणा यांच्यावर खुर्च्या फेकण्यात आल्या. तसेच आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले. त्या म्हणाल्या मी सार्वजनिक सभेला अतिशय शांततेने संबोधित करत होते .

लोकांनी हुल्लडबाजी आणि धार्मिक घोषणाबाजी सुरू केली. मी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले.अपंग लोक सभेत होते आणि काही गडबड झाली असती तर त्यांना सर्वात जास्त फटका बसला असता,”तरीही त्यानी माझ्या कड़े खुर्च्या फेकल्या असे नवनीत राणा म्हणाल्या.या घटनेनंतर माजी लोकसभा खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरियापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी भाजप नेते नवनीत राणा काल खल्लार गावात आल्या होत्या.  रॅली दरम्यान दोन गटात वाद झाला. नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. गावात पोलीस चौकी स्थापन करण्यात आली आहे.
Edited By - Priya Dixit