रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Updated : शनिवार, 9 नोव्हेंबर 2024 (11:58 IST)

आज अकोला आणि नांदेडमध्ये निवडणूक सभांना पीएम मोदी संबोधित करणार

narendra modi
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज ते अकोला आणि नांदेडमध्ये निवडणूक सभांना संबोधित करणार आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी राज्यात 11 ते 12 जाहीर सभांना संबोधित करू शकतात.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. 

आज शनिवार 9 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी अकोला आणि नांदेडमध्ये निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहे. अकोल्यातील रॅलीनंतर पंतप्रधान मोदी नांदेनमध्येही निवडणूक सभेला संबोधित करणार आहे.