संभाजी महाराजांना मानणारे आणि औरंगजेबाची स्तुती करणाऱ्यांमध्ये चुरशीशी स्पर्धा, छत्रपती संभाजी नगर मध्ये मोदींची गर्जना
महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षाचे नेते महाराष्टार्त भव्य सभा घेत आहे.
आज पंतप्रधान मोदींनी छत्रपती संभाजी नगर येथे जाहीर सभा घेतली. त्यात त्यांनी माविआ आणि काँग्रेस पक्षाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ही लढाई छत्रपती सम्भाजी महाराजांना मानणाऱ्यांची आणि औरंगजेबाची स्तुती करणाऱ्यांची आहे.
या निवडणुकीत एकीकडे छत्रपती संभाजी महाराजाना मानणारे देशभक्त आहे. तर दुसरीकडे संभाजी महाराजांच्या खून करणाऱ्याला मसीहा मानणाऱ्यांची आहे.
संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांनी मराठा साम्राज्याचा पाया बळकट केला. अवघ्या वयाच्या 32 व्या वर्षी त्यांची मुघल सम्राट औरंगजेबाने निर्घृण हत्या खेळी.
औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर देण्याची मागणी बाळासाहेब ठाकरे यांनी केली असून महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर देखील काँग्रेसच्या दबावाखाली त्यांनी नामांतर केली नाही. मात्र महायुतीच्या सरकारने हे करून दाखवले. आणि औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर केले आणि जनतेची आणि बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली.
Edited By - Priya Dixit